नीलकांत ढोले

जन्म - १५ जानेवारी १९३९
पत्ता - ट्रक्टर फैंक्टरी चौक
साई नगर, हिंगणा रोड नागपूर १६
संपर्क - ९६७९१५०६२४

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

बुधवार, ३ डिसेंबर, २०१४

परिचय

ज्येष्ठ गजलकार नीलकांत ढोले हे निवृत्त माध्यमिक शिक्षक. 15 जानेवारी 1939 रोजी काटोल जि. नागपूर येथे जन्म झाला. ते सध्या साईनगर हिंगणा रोड नागपूर येथे स्थायिक झाले आहेत. 1980मध्ये त्यांचा "अग्निबन' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. 2003मध्ये कळा काळजाच्या, 2010मध्ये वेदनांची वेधशाळा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सोहळे ऋतूंचे हा ललित, मातीतली माणसं हा व्यक्तिचित्रे, तर चांदणीचा काटा हा कथासंग्रहदेखील त्यांनी प्रकाशित केला.
  • विविध साहित्य संमेलने, जनसाहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, जागतिक मराठी संमेलन, बहुजनवादी साहित्य संमेलन, गजल सागर प्रतिष्ठान, मुंबईद्वारा आयोजित .ग.जल संमेलने, नागपूर उत्सवांतर्गत कविसंमेलनात त्यांनी सहभाग घेतला आहे. 

  •           2002मध्ये त्यांच्या साहित्य व सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप, दलित साहित्य अकादमी नवीदिल्लीचा पुरस्कार, जागतिक मराठी साहित्य संमेलनांतर्गत कविसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.